शरद पवार यांच्यावरील ED कारवाईच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; 'मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी'
आमदार जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  सक्तवसुली संचलनालया (ED) कडून गुन्हा दाखल करण्यात आलं असून यासाठी आज,(27 सप्टेंबर) रोजी त्यांची चौकशी होणार आहे. मुंबईतील बॅलार्ड पियर (Ballard Pier) येथील कार्यालयात शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यात व्यत्यय आणेल असे काम करू नये असे आवाहन करत शरद पवार यांनी एक ट्विट केले होते, या ट्विट वर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत, "मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी, मी जातोय पवार साहेबांसाठी. माफ करा साहेब ह्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही तुमचे नाही ऐकणार"असे म्हंटले आहे. तसेच सर्वानी एकत्र येऊन या चौकशीचा निषेध नोंदवावा असेही आव्हाड यांनी आवाहन केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना संबोधून तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत कर्क रोग मांडी च्या हाडाचे ऑपरेशन पायाला झालेली इजा तरी तुम्ही लढताय वय वर्ष 79 हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलं आहे, आणि म्ह्णूनच उद्या आम्ही सर्व एकत्र येऊन निषेध करणार आहोत अशा आशयाचे ट्विट केले आहे.

जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया

दरम्यान, आज मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरात मुंबई पोलिसांकडून संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरात जमाव होऊन गदारोळ होऊ नये यासाठी पोलीस प्रशंसा प्रयत्नशील आहे.