PM Narendra Modi Vs. Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट आव्हान दिले आहे. शरद पवार यांनी प्रथमच नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की, 'तुमची असेल-नसेल तेवढी सगळी ताकद लावा आणि जे कुणी भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करु दाखवा.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका जाहीर भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. तसेच, शरद पवार यांची लढाई मुलीसाठी आहे, असे म्हटले होते. त्यामुळे संतापलेल्या शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिले. ते छगन भुजबळ यांचे होम ग्राऊंड असलेल्या येवला येथे आयोजित जाहीर सभेतून बोलत होते.

शरद पवार यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींकडे राज्याची आणि देशाची सर्व यंत्रणा आहे. त्यांनी या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर एका आठवड्यानंतर, शरद पवार सक्रीय झाले आहेत. त्यांनी पक्षाचे बंडखोर नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला येथे सभा घेऊन राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात केली. (हेही वाचा, Sharad Pawar Nashik Yeola Sabha: शरद पवार यांनी मागीतली माफी, नागरिकांना अवाहनही केले; नाशिक येथील सभेत काय घडलं? घ्या जाणून)

आपल्या संबंध भाषणात शरद पवार यांनी आपल्या जुन्या सर्व सहकाऱ्यांची नावे घेतली. ज्यांनी सुरुवातीच्या काळात शरद पवार यांना साथ दिली होती. मात्र, आपल्या संबंध भाषणात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव एकदाही घेतले नाही. पण, जरी भुजबळ यांचे नाव घेतले नाही तरी देखील आपल्या भाषणाचा पूर्ण झोत हा पवार यांनी भुजबळ यांच्यावरच ठेवला होता. दरम्यान, शरद पवार यांच्या सभेसाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी गर्दी केली होती. खास करुन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.