Sharad Pawar Birthday Celebration: पवार कुटुंबीयांनी शरद पवारांचे 80 व्या वाढदिवसानिमित्त केले खास औक्षण (Watch Video)
Sharad Pawar 80th Birthday Celebration | Photo Credits: Facebook/ Supriya Sule

एनसीपी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. सकाळी एनसीपी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत वायबी सेंटरमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर आता दुपारी सिल्वर ओक या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बर्थ डे सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. शरद पवारांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबीयांनी खास औक्षण केले आहे. यामध्ये पवारांच्या लेकी-सुनांनी 80 दिव्यांच्या खास थाळीने त्यांचं औक्षण केले. खासदार आणि शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रसंगाच्या वेळी फेसबूक लाईव्ह केले. Sharad Pawar 80th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संजय राऊत यांच्यासह मान्यवरांकडून शरद पवारांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा.

शरद पवार यांचा जन्म बारामतीमध्ये 12 डिसेंबर 1940 साली झाला. आज वयाची 80 वर्ष पूर्ण करून त्यांनी 81 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शरद पवार यांचे 80 व्या वाढदिवसानिमित्त औक्षण

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी देखील खास पत्र आजोबा शरद पवार यांना भेट दिलं आहे. आज सकाळीच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं आहे. त्यानंतर सोशल मीडियामध्येही त्यांनी हे पत्र शेअर केले आहे.

रोहित पवार यांचं पत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Pawar (@rohit_rajendra_pawar_)

आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत एनसीपीकडून खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस शरद पवारांनी बोलताना शाहु, फुले, आंबेडकर यांचे विचार केवळ बोलण्यापुरते नव्हे तर ते आचारणात देखील आणायला हवेत. या विचारांचा वसा पुढे नेणारी पिढी तयार करायला हवी असे आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.