Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

Shakti Law:  राज्यात वाढत्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमुळे याला कुठेतरी आळा बसण्यासाठी राज्य सरकारने एक नवा कायदा आणला आहे. त्यानुसार, महिला आणि मुलांवरील अत्याचाराबद्दल शक्ती कायदा नावाचा नवा कायदा आणला आहे. शक्ती कायद्याचा प्रस्ताव विधान सभेत मंजूर झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले आहे की, शक्ती कायद्याअंतर्गत आरोपीला 2 वर्षांची शिक्षा सुनावली जाणार आहे.(मुंबई: E-Challan न भरल्याने जवळपास 2 हजार Driving License रद्द)

अनिल देशमुख यांनी शक्ती कायद्याबद्दल अधिक माहिती देत पुढे असे म्हटले आहे की, या कायद्याअंतर्गत आरोपीला 2 वर्षांची शिक्षा होणार आहे. जे कोणीही महिलांचे सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने फोटो पोस्ट करतील त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याचसोबत जरी महिलांनी त्यांच्या विरोधातील खोटी तक्रार दाखल केल्यास त्यांना 1 वर्षाची शिक्षा दिली जाणार असल्याचे ही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.(Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार अंतिम सुनावणी)

Tweet:

शक्ती कायद्यानुसार शिक्षेचे प्रमाणात वाढवण्यात आले आहे. तर 9 डिसेंबरला पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शक्ती कायद्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली गेली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली. या शक्ती कायद्यानुसार मुलांसह महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराल चाप बसावा या हेतूने त्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्स सरकारच्या या निर्णयाचे मनसे कडून स्वागत करण्यात आले आहे.