Arrest | Pixabay.com

पुणे शहर पोलिसांकडून सोमवारी (7 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंवर करोडोंचा घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सध्या शैलजा दराडे विरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. DCP (zone 5) Vikrant Deshmukh यांनी दराडेच्या अटकेचं वृत्त कन्फर्म केले आहे. Assistant police inspector Chetan Thorbole या प्रकरणाचा तपास करत आहेत. तो पुढेही सुरू राहणार आहे. आज शैलजा दराडेला कोर्टासमोर दाखल केले जाणार आहे.

सांगलीच्या पोपट सूर्यवंशी या 50 वर्षीय शिक्षकाच्या तक्रारीवरून तपासाला सुरूवात झाली. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी हडपसर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी शैलजाचा भाऊ दादासाहेब दराडे याला कलम 34,406,420 अंतर्गत अटक केली होती. आता हा कारवाईचा बडगा शैलजावरही उगारण्यात आला आहे. Pune Teacher Recruitment Racket: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त Shailaja Darade, त्यांच्या भाऊ नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली पोलिस ताब्यात .

FIR नुसार, दादासाहेब यांनी पोलिसांना सांगितलं की त्याची बहीण शैलजा शिक्षण विभागात अधिकारी असताना सूर्यवंशी यांना तिने कुटुंबातील 2 जणांना सरकारी नोकरी लावून देतो असं सांगत कथित 27 लाख घेतले. पण जेव्हा सांगितल्याप्रमाणे नोकरी लागू शकली नाही तेव्हा त्यांनी पैसे परत मागितले. पण तिने ते दिले नाहीत.

पोलिसांच्या माहितीनुसार सूर्यवंशी यांच्या प्रमाणे आरोपीने 44 अन्य जणांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. जून 2019 पासून त्यांनी यामधून सुमारे 4.85 कोटींचा व्यवहार केला.

पोलिसांनी दादासाहेबांना अटक केली होती मात्र नंतर त्यांची जामीनावर सुटका केली. या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली शैलजा दराडे वर देखील 23 जुलै दिवशी T V Karpate यांनी कारवाई केली.

पोपट सुर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यातील 2019 मधील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आली आहे. ज्यामधे शैलजा दराडे या फक्त शिक्षण विभागातच नाही तर आर टी ओ मधे जर कोणाला नोकरी हवी असेल तर आपण ती देऊ शकतो असं त्या सांगत आहेत.