![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/A-Rape-784x441-1-380x214.jpg)
मालेगाव शहरातील दरेगाव शिवार येथील एका मदरशात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या प्रकरणी मदरशाच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघीजणी महिला आहेत. (पुणे: शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार)
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, पीडिता मुलगी मुंबईच्या मालाड येथे राहणारी आहे. पाच महिन्यांपूर्वी ती धार्मिक शिक्षणासाठी मालेगाव येथील मदरशात दाखल झाली होती.
घराच्या स्वच्छतेच्या कामासाठी या मुलीला बोलावून घेण्यात आले. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आले. शुद्धीवर येताच या मुलीने पोलिस स्थानकात जावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. सध्या तिला नाशिक येथील बाल सुधारकगृहात पाठवण्यात आले आहे. (पुण्यात 6 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण, अत्याचार करणारे दोन्ही आरोपीसुद्धा अल्पवयीन)
या प्रकरणी पोलिसांनी मदरशातील मुख्य व्यवस्थापकासह त्याची पत्नी, एक महिला कर्मचारी आणि एका मुलाला ताब्यात घेतले आहे. या आरोपींना 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे.