संतापजनक! अमरावती येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; वडिलांसह थोरल्या भावालाही अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

एका अल्वयीन मुलीवर (Minor Girl) वारंवार बलाकार केल्याची संतापनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इतर कोणी नसून तिचे वडील, काका आणि थोरल्या भावानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. ही संतापजनक घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 3 आरोपींसह तिच्या मावशीच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वडिलाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचारापासून वाचण्यासाठी पीडिताने आपल्या मावशीच्या घरी राहण्याचे ठरवले. परंतु, मावशीच्या घरी गेल्यानंतर तिच्या नवऱ्यानेही तिच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. याला कंटाळून पीडित पुन्हा आपल्या घरी परतल्यानंतर तिच्या थोरल्या भावनेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर पीडिताने 26 जानेवारी 2018 रोजी अमरावती जिल्ह्यातील एका तालुका मुख्यलयातील पोलिस ठाणे गाठले. आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली, अशी माहिती लोकमतने दिली आहे.

17 वर्षीय पिडिताच्या आईचे गेल्या 2 वर्षापूर्वी कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे ती वडिल आणि भावासोबत राहत होती. दरम्यान, 8 एप्रिल 2018 रोजी पीडिताच्या वडिलाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वडिलाकडून पीडितेवर वारंवार अत्याचार होऊ लागले. पीडिताने हा सर्वप्रकार गावाजवळ राहणाऱ्या आपल्या मावशीच्या कानावर घातला. त्यावेळी मावशीने तू माझ्याकडे येऊन राहा, असा सल्ला दिला. परंतु, पीडित मावशीकडे राहत असतानाच मावशीच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. ही बाब पीडिताने आपल्या मावशीला सांगितला. मात्र, मावशीने याकडे दुर्लक्ष करत मुलीची मानसिक संतुलन ठिक नसल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. पीडिता नाईलाजाने घरी परतली. अखेर याला वैतागून पीडिताने स्थानिक पोलीस ठाण्या.त धाव घेऊन आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. हे देखील वाचा- नागपूर: सहकार्‍याकडून तरूणीवर बलात्कार, गुप्तांगामध्ये रॉड घुसवून ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

जिल्हा पोलीस अधीक्षक, हरी बालाजी एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताने दाखल केलेल्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताच्या वडिल आणि भावाला सोमवारी अटक करण्यात आली आहे. तसेच पीडिताची मावशी आणि मावशीच्या नवऱ्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.