नागपूर: सहकार्‍याकडून तरूणीवर बलात्कार, गुप्तांगामध्ये रॉड घुसवून ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
Rape Case | File Photo

महाराष्ट्रात नागपूर (Nagpur) मधील पारडी (Pardi भागात एका 19 वर्षीय मुलीवर कथित बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये 52 वर्षीय आरोपीने पीडितेला बलात्कारानंतर ठार मारण्याचा प्रयत्न केला असून तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घुसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या प्रकरणामध्ये अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे. सध्या या बलात्कार प्रकरणातील आरोपी अटकेमध्ये असून त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जानेवारीची असून त्या दिवशी घरामध्ये मुलगी एकटी होती. पीडीतेचा भाऊ आणि त्याचा मित्र गावी गेला होता. यावेळेस वेळ साधून मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला ठार मारण्यासाठी गुप्तांगामध्ये रॉड घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर आरोपी पळून गेला होता मात्र त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ANI Tweet  

पीडितेने सारा प्रकार भावाला सांगितल्यानंतर काही दिवसांतच ते पोलिस स्टेशनमध्ये पोहचले. गुन्हा दाखल झाल्याणंतर गोंदिया पोलिसांनी आरोपीच्या हातात बेड्या घातल्या आहेत. दरम्यान पोलिस तपासामध्ये आरोपी आणि पीडित तरूणी दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत असल्याचं समोर आलं आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी दिवशी पीडित तरूणी तक्रार दाखल करण्यासाठी हजर झाली. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दरम्यान तक्रार दाखल केल्यानंतर गोंदिया पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान पीडित तरूणी ज्या कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होती त्याच कंपनीमध्ये आरोपी सुपरवाईजर म्हणून काम करत होता.