देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच जळगाव (Jalgoan) येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव येथील पहूर (Pahur) येथे एका सहा वर्षीय चिमुकलीकर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपू्र्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवाशी आहे. दरम्यान, पीडिता ही शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातच राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीने तिला निर्जन ठिकाणी नेले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताविरोधात पहून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! कुटूंबातील आजारपणाला कंटाळून एका तरुणीने आई आणि कोमात असलेल्या भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, त्यानंतर केली आत्महत्या
जळगाव येथील पहूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण निर्माण झाले आहे. तसेच आपल्या मुलींना घराबाहेर पाठवयाचे की नाही? असा प्रश्न पालकवर्गांना सतावत आहे.