
मुंबई पोलिसांनी एका 21 वर्षीय UPSC aspirant ला सूरत मधून एक्सटॉर्शनच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी आणि तिच्या सहकाऱ्यांनी डेटिंग अॅपवरून पुरुषांची माहिती गोळा केली. 14 महिन्यांत शहरातील एका व्यावसायिकाकडून 30 लाख रुपये उकळले. RAK Marg police कडून लक्ष्मी मंडलला बेड्या ठोकल्या आहे. लक्ष्मी ही मूळची झारखंडची आहे. लक्ष्मीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तिने सहकार्यांच्या सोबत बिझनेसमॅन सोबत सुरूवातीला गप्पा मारल्या. नंतर त्याच्याकडूनच पैसे उकळले. लक्ष्मीचे लग्न झालेले आहे आणि ती सूरत मध्ये पतीसोबत राहते. तिच्या इंस्टा अकाऊंट वर स्वतःला व्हिडीओ क्रिएटर आणि रायडर म्हणवते. तिच्या अकाऊंट वर दूचाकी,चारचाकी चालवतानाचे अनेक व्हिडिओ आहेत. असे TOI च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान व्यापार्याच्या पत्नीने पत्नी सतत उदास आणि ताणात असलेला पाहून एफआयआर नोंदवली. तिने त्याच्या तणावाचं कारण विचारलं. पतीला पोलिस स्टेशन मध्ये नेऊन तक्रार नोंदवली. आय अॅक्ट अंतर्गत एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे उकळल्याचं पोलिस तक्रारीमध्ये नोंदवण्यात आलं. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचा मोबाईल हॅक झाला असून त्यामधील त्याच्या पत्नीचे प्रायव्हेट फोटोज पाहिल्याचं म्हटलं. ते फोटो वायरल केले जातील अशी धमकी देखील दिली. त्यानंतर 30 लाख उकळले. त्याकरिता 50 वेगवेगळे व्यवहार झाले.
पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मौनी राय ने आपले आधार डिटेल्स भरून डेटिंग अॅप वर रजिस्ट्रेशन केलेले होते. तिने व्यावसायिकाचे तपशील हे डेटिंग अॅपवरून मिळाल्याचं म्हटलं आहे पण त्याने ते नाकारले आहे. सध्या पोलिस डिटेल्स तपासून पाहत आहेत.
तपासामाध्ये 10 लाखापेक्षा अधिक रक्कम विविध अकाऊंटमध्ये फ्रीझ करण्यात आली आहे. सोबतच 20 मोबाईल आणि 89 सीम कार्ड्स, 3 लॅपटॉप्स, 7 एटीएम कार्ड्स आणि 1 बुलेट देखील ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलिसांनी डिसेंबरमध्ये चंद्रमणी सिंग, सोनू हेला, सूरज सिंग, शुभम राय आणि एक महिला मौनी राय या पाच जणांना कोलकाता येथून त्यांच्या कथित भूमिकेसाठी अटक केली होती.