Washim Sex Racket Case: वाशिममध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका, दोघांना अटक
Image only representative purpose (Photo credit: pxhere)

महाराष्ट्रातील वाशिम (Washim) येथील कथित वेश्याव्यवसायाच्या (Prostitution) अड्ड्यावर छापा टाकून पाच महिलांची सुटका करण्यात आली आणि दोन जणांना अटक करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.  जाकलवाडी (Jakalwadi) येथील एका घरातून बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेट (Sex racket) सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर छापा टाकण्यात आल्याचे वाशिमचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, पाच महिलांची सुटका करण्यात आली, तर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून 2.9 लाख रुपये रोख आणि तीन फोन जप्त करण्यात आले आहेत. अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी, मुंबई पोलिसांनी नवी मुंबईत छापे टाकून वेश्याव्यवसायात भाग पाडणाऱ्या 17 महिलांची सुटका केली होती आणि पिंप म्हणून काम करणाऱ्या नऊ जणांना अटक केली होती.ते म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी युनिटने (AHTU) 5 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मानवी तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या राजू आणि साहिल नावाच्या दोन लोकांविरुद्ध एका महिलेने 4 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हेही वाचा मुंबईवर 26/11सारखा हल्ला पुन्हा होणार, Mumbai Police ना पाकिस्तानी नंबरवरून मिळाली धमकी

महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी वेगवेगळ्या राज्यातून महिलांना मुंबईत नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन आणत असे. ते म्हणाले, महिलांना मुंबईत आणल्यानंतर, तो त्यांना नवी मुंबईच्या शेजारील नेरूळ येथे अज्ञात स्थळी कोंडून ठेवायचा आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडायचा. आरोपी त्या महिलांना लॉज आणि हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवत आणि अवैध धंदे करून पैसे कमवत असत. घटनास्थळावरून 17 महिलांची सुटका करून नऊ पुरुषांना अटक केली.