प्रतिकात्मक फोटो. (Photo Credit: PTI)

ठाणे जिल्ह्यात (Thane) पोलिसांकडून (Thane Police) सेक्स रॅकेटचा (Sex Racket) प्रर्दाफाश करण्यात आला. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्तचराच्या माहितीवरून, मानवी तस्करी (Human Trafficking) प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी एका मॉलजवळून आरोपी महिलेला पकडले. याशिवाय दोन महिलांची सुटका करण्यात आली. (Two Women Released) याबाबत ठाणे पोलिसांनी माहिती दिली. सीनिअर इन्स्पेक्टर महेश पाटील (Mahesh Patil) यांनी सांगितले की, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेने या दोन मुलींना जबरदस्तीने या काळ्या धंद्यात ढकलले होते. आरोपी महिलेविरुद्ध वर्तक नगर पोलिस ठाण्यात (Vartak Nagar Police Thane) मानवी तस्करी कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अनेक प्रकरणे उघडकीस

यापूर्वीही ठाणे जिल्ह्यात सेक्स रॅकेटशी संबंधित अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात अनेक हायप्रोफाईल केसेसचाही समावेश आहे. या वर्षी 3 जानेवारी रोजी ठाणे गुन्हे शाखेने एका घरावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यावेळी 2 अभिनेत्री, 2 महिला एजंट आणि पुरुष दलालासह 5 जणांना अटक करण्यात आली. (हे ही वाचा पुण्यात 'तोकडे कपडे' घातल्यावरून भाडेकरू म्हणून राहणार्‍या 2 मुलींना मारहाण; एकाच कुटुंबातील 6 जण पोलिसांच्या ताब्यात)

हनीट्रॅप सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

याशिवाय ठाणे जिल्ह्यात हनीट्रॅप सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश झाला. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी फसवणूक करणाऱ्या लोकांना पूर्वनियोजित ठिकाणी बोलावून घेत आणि नंतर त्यांना लुटण्याचे प्रकार घडत. या प्रकरणी पोलिसांनी 3 महिलांसह 7 जणांना अटक केली होती.