प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Sex Racket in Thane: ठाण्यात सेक्य रॅकेटचा पर्दाफाश (Sex Racket in Thane)करण्यात आला आहे. या कारावाईत पोलिसांनी पाच महिलांची सुटका (Women Rescued)केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. हे रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांसह तिघांना पोलिांनी अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी शाखेने शुक्रवारी काशिमीरा भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका रेस्टॉरंट-कम-बारमध्ये कारवाई केली. फसवणूक करणाऱ्या ग्राहकाला अटक करण्यासाठी सापळा रचला. त्या कारवाईबाबतची माहिती सहायक पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांनी दिली. (हेही वाचा: Sex Racket In Pune: थाई महिलेद्वारे अपार्टमेंटमध्ये चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी दोन पीडितांची केली सुटका)

पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, एक कार आणि 10.66 लाख रुपये किमतीच्या इतर वस्तू जप्त केल्या, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी 26 वर्षीय महिलेला अटक केली आहे. महिला मूळची दिल्लीची आहे. सध्या मुंबईच्या शेजारील जोगेश्वरी भागात राहते. आणखी एक 43 वर्षीय महिला आणि 40 वर्षीय पुरुषाला अटक केली आहे. दोघेही मीरा रोड येथे राहणारे आहेत असे पोलिसांनी सांगितले.(हेही वाचा: Prostitution Racket Busted in Chennai: चेन्नईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 14 वर्षांच्या बहिणीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपी बहिणीसह 5 जणांना अटक)

पाच महिलांची शेल्टर होममध्ये रवानगी

भारतीय न्याय संहिता कलम 143(3) (मानवी तस्करी) आणि 3(5) (सामान्य हेतूच्या पूर्ततेसाठी अनेक व्यक्तींनी केलेले गुन्हेगारी कृत्य) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 च्या तरतुदींनुसार आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर पीडित पाचही महिलांची शेल्टर होममध्ये रवानगी करण्यात आली आहे.