Bus In Speed | representative Image | Pixabay.com

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणानंतर बस प्रवासाच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई मध्ये मंगळवारी असाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शाळकरी मुलांची सहलीची बस चालवणारा चालक आणि बस चा वाहक दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. वाहतूक विभाग पोलिसांच्या सजगतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला आहे. ही बस अंधेरी परिसरात आढळली आहे.

अंधेरी मध्ये एका शाळेची सहल घेऊन जाणारी बस अंधेरी-कुर्ला मार्गावर विचित्रपणे चालत असल्याचं ट्राफिक पोलिसाच्या लक्षात आलं आणि त्याने ती बस हात दाखवत थांबवली. पोलिसाने चालक आणि वाहकाची तपासणी करता त्यांना हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी शाळेच्या शिक्षकांना त्याची माहिती देत बस पुढे जाण्यास मज्जाव केला. सध्या बसच्या चालक आणि वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नक्की वाचा: Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू. 

शाळकरी सहलीच्या बसचा चालक- वाहक नशेत

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

मुंबई मध्ये 9 डिसेंबरला रात्री बेस्ट बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला आहे. त्यानंतरही बेस्ट बसशी निगडीत 2-3 अपाघाताचे प्रकार आणि एक बस चालक चक्क बस रस्त्यात थांबवून दारूच्या दुकानातून काही वस्तू खरेदी करताना कॅमेर्‍यात कैद झाला आहे. दरम्यान या घटनांनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.