Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Nashik Shocker: नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) टाकेड (Taked) येथे शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या लाजिरवाण्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीला तिच्या वर्गशिक्षिकांनी मुख्याध्यापकांच्या घरी पाठवले होते. मुख्याध्यापकाने त्याच्या घरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

तुकाराम साबळे असं या आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक जोशी यांना अटक केली आहे. याप्रकरणी, मुख्याध्यापकाविरोधात घोटी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. (हेही वाचा -Mankhurd Rape Case: मानखुर्द मध्ये 17 वर्षीय मुलाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार)

नाशिकमधील पंचवटी येथे 18 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार -

गेल्या महिन्यात नाशिकमधील पंचवटी येथील चोपडा लॉन्स रोडवरील एचपी पेट्रोल पंपाजवळील गव्हाच्या शेतात एका 18 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तुरुंगात असलेल्या पतीला जामीन मिळावा म्हणून नाशिकला आलेल्या पीडित महिलेला तिच्या जवळच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच तिला ओलीस ठेवले ( वाचा: Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.)

दरम्यान, पीडित महिला शौचालयात जाण्याच्या बहाण्याने पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर तिने नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर हा खटला पंचवटी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ज्यानंतर पोलिसांनी पाचपैकी दोन आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.