शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती आणि विविध मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल असोसिएशन (IESA) यांनी आज सोमवारी (25 फेब्रुवारी) राज्यात शाळा बंद आंदोलन करणार आहेत. या आंजोलनात जवळजवळ अडीच हजार खासगी इंग्रजी माध्यमातील शाळा सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते. तसेच शाळेत सुरु असणाऱ्या परिक्षांवर आंदोलनामुळे कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची जबाबदारी ही मुख्य बाब असून ती मुख्यध्यापकांऐवजी शाळेतील वाहतूक व्यवस्थापनाकडे देण्यात यावी, मोफत पुस्तके आणि गणवेश अशा बाबी सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचसोबत स्वयंअर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्द करुन देण्यात यावी अशा विविध मागण्या आंदोलनात ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील 14 पेक्षा अधिक शालेय संघटना सहभागी होणार असल्याचे ईसाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनातील मागण्या गेली कित्येक दिवस प्रलंबित राहिल्या आहेत.तसेच आता शाळा बसमालक ही आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे आज शालेय बस सेवा बंद राहणार आहे.