School Buse | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election)  होणार आहे. सध्या या निवडणूकीची धामधूम सुरू असताना 19-20 नोव्हेंबरला शाळेच्या बसची सुविधा कोलमडण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, निवडणूकीच्या कामांसाठी मुंबई मध्ये आरटीओ (Mumbai RTO) कडून टूरिस्ट आणि शाळेच्या बस वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

School Bus Owners Association of Maharashtra (SBOA) च्या माहितीनुसार, 19आणि 20 नोव्हेंबरला स्कूल बस सेवेमध्ये नसतील. दरम्यान, सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) हे निर्देश महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी लॉजिस्टिक व्यवस्थेचा भाग म्हणून जारी केले आहेत.

याशिवाय, अनेक प्रादेशिक शाळांना निवडणुकीसाठी मतदान केंद्रे म्हणून नियुक्त केले गेले आहे, ज्यामुळे गोंधळ वाढला आहे. अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक बूथ कर्तव्ये सोपवण्यात आली आहेत, ज्यामुळे नियमित वर्ग चालवण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सामान्य शाळेच्या वेळापत्रकात व्यत्यय येऊ शकतो.

स्कूल बस ओनर्स असोसिएशन (SBOA) ने पालक, विद्यार्थी आणि सामान्य जनतेला सहकार्याचे आवाहन केले आहे. शनिवारी जारी केलेल्या निवेदनात, असोसिएशनने सुरळीत निवडणुकांसाठी या व्यवस्थांच्या महत्त्वावर जोर दिला आणि प्रत्येकाने निवडणुकीच्या काळात या तात्पुरत्या व्यत्ययाचा विचार करण्याची विनंती केली आहे. Mahayuti Government Report Card: महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जाहीर होताच महायुतीने जारी केलं रिपोर्ट कार्ड; 'लाडकी बहीण योजना' कायमस्वरुपी, राज्य सरकार चा पुनरूच्चार .

महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणूकीची मतमोजणी आहे. 288 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकांमध्ये नवे आमदार निवडले जाणार आहेत.