महाराष्ट्र विधानसभा निवडणूकेची (Maharashtra Vidhan Sabha Election) तारीख जाहीर झाल्यानंतर आज (16 ऑक्टोबर) महायुती ने पत्रकार परिषद घेत त्यांचं रिपोर्ट कार्ड वाचून दाखवलं आहे. आगामी निवडणूकीसाठी भाजपा, शिवसेना आणि एनसीपी हे तिन्ही पक्ष एकत्र सामोरे जाणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी मागील दीड दोन वर्षामध्ये केलेल्या कामांचा, योजनांचा पाढा वाचला आहे. महायुती साठी 'माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जात असल्याने ती विरोधकांच्या निशाण्यावरही आहे. पण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना 'माझी लाडकी बहीण योजना' कायमस्वरूपी राहणार असल्याचा पुनरूच्चार केला आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या चेहरावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार यांना थेट आव्हान; पहा काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा मविआ वर हल्लाबोल
देवंद्र फडणवीस यांनी मविआ वर हल्लाबोल करताना एकीकाडे ते आपण सत्तेत आल्यास 1500 वरून 2000 रूपये करणार असं म्हणतात आणि दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, असंही म्हणतात. मग त्यांनी टीका करण्यापूर्वी आधी नक्की ठरवावं की योजनांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत की नाही? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजने ला हात लावला तर याद राखा…त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. असे म्हणाले. Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून .
#WATCH | Maharahstra CM Eknath Shinde and Deputy CMs Devendra Fadnavis, Ajit Pawar release 'Mahayuti' government report card during their joint press conference in Mumbai
RPI(A) chief and Union Minister Ramdas Athawale is also present. pic.twitter.com/63PXcMcJNE
— ANI (@ANI) October 16, 2024
महायुतीने आज रिपोर्ट कार्ड मांडताना आपण दोन ते अडीज वर्षामध्ये 900 निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील होते.
महाराष्ट्रात आता 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूका होणार आहेत तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे.