1 नोव्हेंबरपासून नव्या महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या धामधुमीनंतर आता नव्या महिन्याचं स्वागत करून घरामध्ये आर्थिक जुळवाजुळवी करण्यासाठी तयारी सुरू झाली असेल. मग पहा तुमच्या पैशांचं नियोजन करण्यापूर्वी 1 नोव्हेंबरपासून कोणकोणते नियम बदलले आहेत आणि त्याचा तुमच्यावर कसा आणि कितपत परिणाम होऊ शकतो. 1 नोव्हेंबर पासून एसबीआय बॅंक, सार्वाजनिक बॅंकां यांच्यामध्ये कार्यकालीन वेळेपासून अगदी कर्जाच्या व्याज दरापर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. तसेच एअरसेल कंपनीच्या युजर्ससाठी देखील 1 नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची आहे. त्यामुळे पहा 1 नोव्हेंबर पासून होणार्या कोणत्या बदलांबाबत तुम्ही सतर्क रहायला हवेचं!
SBI बॅंक ग्राहक:
SBI बॅंक ग्राहकांना 1 नोव्हेंबर पासून डिपॉझिटवर व्याजदर 0.25 टक्के घटवून 3.25 टक्के करण्यात आला आहे. तसेच 1 लाखांहून जास्त डिपॉझिट केलेल्या रकमेवरच्या व्याजाला रेपो रेटशी जोडण्यात येणार आहे. येथे वाचा सविस्तर.
सार्वजनिक बँकांच्या वेळांत बदल
केंद्र सरकारच्या ईज (EASE) मुळे आता ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखांच्या वर्गवारी नुसार कामकाजाची वेळ ठरवली जाणार आहे. बॅंकांच्या वर्गीकरणाप्रमाणे सकाळी 9 ते दुपारी 3, सकाळी 10 ते सायंकाळी 5 आणि 11 ते संध्याकाळी 5 अशा तीन वेळांत बँका सुरू राहणार आहेत. येथे वाचा सविस्तर.
Aircel ग्राहक:
TRAI च्या नव्या नियमानुसार एअरसेल (Aircel) ची सेवा 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.
नंबर पोर्ट करण्याची 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने जर तुमचा नंबर पोर्ट केला नसेल तर ते कार्ड बंद होणार असून नंबर पुन्हा अॅक्टिव्हेट करता येणार नाही. येथे वाचा सविस्तर.
मुंबई -पुणे रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान महिन्याभराचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून पुढील 30 दिवस मध्य रेल्वेच्या मुंबई - पुणे मार्गावर प्रवास करणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. या मार्गावर प्रवास करण्यासाठी तुम्हांला इतर पर्यायी वाहतूक प्रकाराचा विचार करावा लागणार आहे.येथे वाचा सविस्तर.
कोकण रेल्वेचं वेळापत्रक बदलणार
कोकण रेल्वेचं वेळात्रक 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावासाळी काळात करण्यात आलेले बदल 1 नोव्हेंबरपासून पुन्हा बदलण्यात येणार आहे. 10 जूनपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. तर कोकण रेल्वे मार्गावर विलंब टाळण्यासाठी गाड्यांचा वेगही टप्प्याटप्प्याने वाढवला जाणार आहे.
नवा महिना सुरू झाला असल्यांने आणि दिवाळी सारखा मोठा सण नुकताच पार पडल्याने आता पुन्हा पैसे बचतीसाठी, काटकसरीसाठी नवीन पर्यायांचा विचार करायला सुरूवात झाली असेल. मग या महिन्यातील हे बदल लक्षात घेऊनच पुढील महिन्याभराचं प्लॅनिंग करा.