सातारा येथे आज स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा होत असताना मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका परिवाराने न्याय मागण्यासाठी चक्क अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. परंतु पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. तर नलावडे या कुटुंबियांची बँकेतील अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती देण्यात आली आहे.(Chikhali Rape Case: बुलढाणा येथे 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 2 दोषींना फाशीची शिक्षा; चिखली पोलिस स्थानकात जोरदार सेलिब्रेशन See Pics)
दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक मधील अधिकाऱ्यांनी नलावडे यांच्या कुटुंबाची जवळजवळ 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. त्यामुळेच आपल्याला न्याय मिळावा म्हणून नलावडे यांनी साताऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसबाहेर आत्महदहानाचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य दिन असल्याने पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु तरीही आत्महदहनाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणातील एका महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.(कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची मदत; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती)
नालवडे कुटुंबातील एकूण तीन जणांची फसवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या तिघांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपली लाखो रुपयांची फसवूक केल्याचा आरोप केला. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या वेळी आम्ही आत्मदहन करु असा इशारा सुद्धा नलावडे कुटुंबियांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न करत अंगावर पेट्रोल टाकले. पण या दरम्यान ज्योती नलावडे यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेण्यात आल्याचे ही सांगण्यात आले आहे.