बुलढाणा (Buldana) येथे 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 2 दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनवल्याने चिखली पोलिस स्थानकात (Chikhli Police Station) काल (13 ऑगस्ट) जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यासाठी चिखली पोलिस स्थानक दिवाळी असल्याप्रमाणे सजवण्यात आले होते. लायटिंग करण्यात आली होती. फटाके फोडून सर्वांनी विजयाचा आनंद साजरा केला. या संदर्भात पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, "9 वर्षांच्या मुलीवर अत्यंत क्रुरपणे बलात्कार करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही सर्व अत्यंत आनंदी आहोत." दरम्यान सेलिब्रेशनचे फोटोज एएनआय वृत्तसंस्थने ट्विट केले आहेत.
27 एप्रिल 2019 रोजी आरोपींनी अल्पवयीन मुलीला स्कुटीवरुन पळवून नेवून स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान दीड वर्षांनंतर दोषींना शिक्षा झाल्याने पीडित मुलीला न्याय मिळाला आहे. (Mumbai: मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करणारे 3 आरोपी अटकेत)
ANI Tweet:
Correction: The Sessions Court has given capital punishment to the 2 accused in the rape case of a 9-year-old girl in Buldana's Chikhli. #Maharashtra https://t.co/DPe9HYsBct
— ANI (@ANI) August 14, 2020
तब्बल दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर मिळालेले यश चिखली पोलिस स्थानकातील पोलिसांनी अशा पद्धतीने साजरे केले आहे. दरम्यान दोषींना झालेल्या फाशीच्या शिक्षेमुळे अशा प्रकराच्या कृत्यांना चाप लागण्यास आणि बलात्काराची मानसिकता पुसून टाकण्यास नक्कीच मदत होईल.