जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण सारस्वत बँकेत ज्युनिअर ऑफिसर पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकर भरती मुंबई, पुणे, ठाण्यासह अन्य ठिकाणी होणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती पदवीधर असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2020 देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचा ऑनलाईन अर्ज आणि बायोटेडा देणे आवश्यक आहे. सारस्वत बँकेत 100 रिक्त पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार असून उमेदवारांना नियमाअंतर्गत पगार देण्यात येणार आहे.
सारस्वत बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार फ्रेशर किंवा एक्सपर्ट अर्ज करु शकणार आहेत. बँकेत फुल टाईम नोकरीची वेळ असणार असून कायमस्वरुपी रुपात निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून 600 रुपये शुल्क वसूल केला जाणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली असून तेथूनच अर्ज भरता येणार आहे. उमेदवाराने B.Com / BCA / B.E / BMS / Graduate Degree असणे आवश्यक आहे.अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्ष ते 27 वर्ष असावे.
भारतीय स्टेट बँक (SBI) ने ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन व विक्री) पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. या पदांवर देशभरात एकूण 3387 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ही भरती एसबीआय www.sbi.co.in च्या अधिकृत संकेतस्थळावरुन केली जाणार आहे.एसबीआय लिपिक 2020 ची नोंदणी 03 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार एसबीआय लिपिक 2020 भरतीसाठी 26 जानेवारी 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी पूर्व परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा 19 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे.