Nashik Accident News: बस दरीत कोसळून (Bus Accident) घडलेल्या अपघातत 15 ते 20 प्रवासी अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड (Saptashrungi Gad Ghat) घाटात गणपती टप्पा येथे घडली. ही बस संप्तश्रृंगी गडावरुन खामगावच्या दशेने निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शाससीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील अपघातस्थळी रवाना झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, खामगाव आगाराची ही बस काल (मंगळवार, 12 जुलै) रोजी सप्तश्रृंगी मुक्कामी होती. मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही बस पुन्हा परतिच्या दिशेने म्हणजेच सप्तश्रृंगी ते खामगाव (बुलढाणा) प्रवासाला निघाली. दरम्यान, वणी येथील सप्तश्रृंगी गडावरुन उतरत असताना बसला अपघात झाला. बस सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळली. (हेही वाचा, Mumbai Nashik Accident: मुंबई - नाशिक महामार्गावर कंटनेरची कारला धडक, धडकेत एकाचा जागीच मृत्यू)
बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, साधारण 15 ते 20 प्रवासी दरीत अडकले असावेत अशी माहिती आहे. अद्याप पर्यंत तरी कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. एक महिला मात्र जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमामावर घटनास्थळी गर्दी केली. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची रहदाही होती. अपघातामुळे या रहदारीलाही काहीसा फटका बसला. वाहतुकीचा वेग मंदावला.
ट्विट
#WATCH | Several people injured after a bus fell into a ravine in Maharashtra's Nashik district.
More details are awaited.
(Source: Local police) pic.twitter.com/y6Lntdeq18
— ANI (@ANI) July 12, 2023
दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघात स्थळी जाऊन अपघातग्रस्तांची मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे. बसला अशा प्रकारे अपघात घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.