दरवर्षी प्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळा (Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala) अनुभवण्यासाठी वारकरी मोठ्या उत्साहामध्ये आहे. या सोहळ्याची सुरूवात देखील आहे. 9 डिसेंबरला उत्पत्ती एकादशी (Utpatti Ekadashi) आणि 11 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे हे 727 वे वर्ष आहे. यानिमित्ताने माऊलींच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. हैबतबाबांच्या पारीचं पूजन करून या सोहळ्याला 5 डिसेंबर पासून सुरूवात झाली आहे. आता 11 डिसेंबर पर्यंत पुढील कार्यक्रम टप्प्याटप्प्याने वेळापत्रकानुसार संपन्न होणार आहे. नक्की वाचा: Utpatti Ekadashi 2023 Date: यंदा उत्पति एकादशी कधी? जाणून घ्या तारीख .
संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळ्यामध्ये आता 5 ते 12 डिसेंबर दरम्यान रोज पवमान अभिषेक, दुधारती, महापूजा, नैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागरण होणार आहे. 700 वर्षांपूर्वी विठू रायाने आपला लाडका भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढे दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीला येईन असा शब्द दिला होता.आजही देवाच्या पादुकांसह हजारो भाविक त्यानिमित्ताने आळंदीला येतात.
सध्या संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पंचक्रोशीमध्ये हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. इंद्रायणीत या कार्तिकी यात्रेनिमित्त वारकरी स्नान देखील करतात. त्यामुळे सध्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी दुमदुमत आहे.
संजीवन समाधी सोहळा, आळंदी.
कीर्तन रुपी सेवा, आळंदी भजनी मंडप.🙏🙏
🌺||राम कृष्ण हरी||🌺 pic.twitter.com/3iJIltR02M
— Shriganesh Badhekar (@shriganesh___) December 6, 2023
बंद घेतला मागे
आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीमध्ये मागील काही दिवस वातावरण तापलेले होते.5 डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती. मात्र संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी आलेल्या वारकर्यांची गैरसोय होईल म्हणून अखेर तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. विश्वस्तांमध्ये एकाही स्थानिक व्यक्तीची निवड न करण्यात आल्याने 5 डिसेंबरला बंद घोषित करण्यात आला होता.