Phone Tapping Case: Anti-Social Elements म्हणून फोन टॅप केल्याच्या मुंबई पोलिसांच्या माहितीवर पहा Sanjay Raut यांनी  काय दिली पहिली प्रतिक्रिया!
Sanjay Raut (Pic Credit - ANI)

महाराष्ट्रामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन ते समाजघातक घटक (Anti-Social Elements) आहेत या सबबीवरून टॅप करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी आज दिली आहे. राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या पत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार संजय राऊतांचा फोन 60 वेळा तर एकनाथ खडसेंचा फोन 67 वेळा टॅप झाला आहे. दरम्यान यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना SID commissioner Rashmi Shukla यांनी आमच्यावर anti-social elements हा चूकीचा ठपका ठेवला आहे. आमच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. एका पक्षासाठी काम करणार्‍या पोलिस अधिकार्‍याला केंद्र सरकार सुरक्षा पुरवत असल्याचं आणि ते दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी 2 वेळा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला असून, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचेही जबाब नोंदवले आहेत.

2019 ला महाविकास आघाडीची मोट बांधली जात असताना हे फोन टॅपिंग झाल्याचं म्हणणं आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले असून राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांचा दावा आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी समिती गठित केली असून राज्य शासनाला त्याचा अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.