Sanjay Raut on Girish Kuber: 'महापुरुषांवर लिहिताना भान असावे, कितीही हुशार, विद्वान असलो तरी'; संजय राऊत यांचा गिरीश कुबेर यांना टोला, शाईफेकीचा मात्र निषेध
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

मराठीतील एका दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळी झालेल्या शाईफेक प्रकरणावरुन शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आपण कितीही हुशार आणि विद्वान असलो तरी, महापुरुषांवर लिखान करताना भान असायला हवे', असा टोला राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा मात्र संजय राऊत यांनी निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत. त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी लिखना करताना नेहमीच सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

महापुरुषांशी देश आणि जगभरातील लाखो लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आक्षेपार्ह लिखान केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. काही वर्षांपूर्वी जेम्स लेन याच्या लिखानावरुनही महाराष्ट्रासह देशभरात वादळ उटलेले आपण पाहिले आहे. त्यामुळे आपण कितीही हुशार किंवा विद्वान असलो तरी लिखान करताना भान ठेवावयलाच हवे, असेही संजय राऊत म्हणाले. नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात कुबेर यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीचा आम्ही निषेध करतो, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan 2021: भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर संमेलनाला येणार नाही, त्यांची प्रकृती ठिक नसल्याची प्रसारमाध्यमांची माहिती)

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. याविशयी विचारले असता राष्ट्रपतींनी रायगडावर जाऊन अभिवादन करणे हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे. आम्ही राष्ट्रपतींचे अभिनंदन करतो, असे संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यसभेतील 12 खासदारांचे करण्यात आलेले निलंबन हे नियमबाह्य आहे. तीन महिन्यांनीही पुढच्या अधिवेशनात शिक्षा देणे हे कोणत्या नियमात बसते? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.