Dr. Jayant Naralikar (Photo Credit - Film and Television Institute of India Pune/FB)

आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) नाशिकमध्ये (Nashik) सुरुवात होणार आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. पण त्याआधी म्हत्वाची अपडेट संमेलना संबधित समोर येत आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती प्रसारमांध्यमानी दिली आहे. अयोजकांकडून माहिती मिळत आहे कि माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत.

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नाॅलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिक येथे आयाेजित करण्यात आले आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. त्यापूर्वी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. (हे ही वाचा Omicron: दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह; किशोरी पेडणेकर यांची माहिती.)

संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट

साहित्य संमेलनावर कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंटचे सावट दिसुन येत आहे. त्यामुळ साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या  50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.

साहित्य संमेलनात अवकाळी पावसाचे सावट

 काल सकाळपासूनच नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळं साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचलंय, त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहेत. पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.