राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सकाळचा लाऊडस्पीकर आता बंद झाला, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. या टीकेला शिवसेनेचा लाऊडस्पीकर कायमच वाजत असतो. पाठिमागील 57 वर्षे हा लाऊडस्पीकर वाजतो आहे. पण तुमच्या पिपाण्या जनतेने केव्हाच बंद केल्या आहेत. असे सडेतोड प्रत्युत्तर राऊत यांनी दिले आहे. शिवसेना नावाचा 'लाऊडस्पीकर' पुढेही कायम वाजत राहिल. महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बुलंद करत राहिल, असेही राऊत यांनी म्हटले आहे. भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात खूपच बदल असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठासून सांगितले की, आदित्य ठाकरे यांनी ठाणे येथून महाराष्ट्र दौरा सुरु केला. त्यांच्या सभा, रॅली, रोड शो यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जनतेचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे. खरे तर उदंड हा शब्दही कमी पडेल अशी जनतेची उत्स्फूर्त दाद जनतेकडून आदित्य टाकरे यांना मिळत आहे. त्यांचा दौरा आणि त्यांचे भाषण पाहून शिवसेनेवर ओढावलेल्या परिस्थितीमुळे लोकांच्या डोळ्यात आश्रु आहेत. (हेही वाचा, Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कट्टर शिवसैनिकांना अश्रू अनावर;पाहा व्हिडिओ)
देवेंद्र फडणीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना या चार अक्षरांचा लाऊडस्पीकर पाठिमागील 56 वर्षे सुरु आहे. यापुढेही तो अव्याहतपणे मराठी माणसाचा आवाज बुलंद करत राहिल. महाराष्ट्राचा मराठी माणूस आणि संपूर्ण देश एका निश्चित अशा निष्ठेने शिवसेना पक्षाच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे यापुढेही शिवसेनेची गर्जना कायम राहील. त्यामुळे शिवसेनेच्या लाऊडस्पीकरची कोणी काळजी करु नका. पण आपण किती दिवस 'एक दुजे के लिये' स्क्रिप्टमध्ये अडकून पडणार? आपण आणखी किती काळ दिल्ली वाऱ्या करणार आहात, असा सवालही राऊत यांनी या वेळी उपस्थित केला.