ईडी (ED) ने पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये (Patra Chawl Scam) शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करून जेलमध्ये टाकल्यानंतर हे दडपशाहीचं सरकार आहे असं म्हणत राऊतांची पाठराखण केली होती. आज 103 दिवसांचा कारावास भोगल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा संजय राऊत मातोश्री वर पोहचले तेव्हाही पुन्हा नव्या जोमाने शिवसैनिकांनी संजय राऊतांचे स्वागत केले. युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वतः मातोश्री च्या गेटवर उभे होते. राऊतांनी देखील आदित्य ठाकरेची कडकडून गळाभेट घेत स्वागत केले. यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
संकटकाळामध्ये लढतो तोच मित्र असं म्हणत संजय राऊत यांची पाठराखण केली. राऊत घरातील एक व्यक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'राजकारणातील कटूता संपवायला हवी' या राऊतांच्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मकता दर्शवल्यानंतर दबक्या आवाजात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर बोलताना 'जर संजय राऊतांना मांडवली करायची असती तर ते 100 दिवस जेल मध्ये नसते.' असं म्हणाले आहेत. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीवप्राण्याप्रमाणे वागत आहेत असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरेंनीही 'राऊत नॉट आऊट' आणि 'टायगर इज बॅक' या दोन ट्रेंड्सचा धागा पकडत स्वागत केले. नक्की वाचा: Sanjay Raut On Raj Thackeray: संजय राऊत यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्यावर निशाणा .
जादू की झप्पी.....❤️🔥💪🚩#AadityaThackeray#SanjayRaut
.@AUThackeray @rautsanjay61 pic.twitter.com/Q1m1ALr1ig
— Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) November 10, 2022
संजय राऊत यांनी जेल मधील दिवस खडतर होते असं सांगताना जेल मधील वेळेचा सदउपयोग करत 2 पुस्तकं लिहून ठेवल्याचं म्हटलं आहे. जेलमधील अनुभव त्यामध्ये असतील असेही म्हटलं आहे.
दरम्यान पुढील 2 दिवस तब्येतीकडे लक्ष देणार आहे. नंतर पुन्हा दौरे सुरू करणार. पक्षाने सांगितलं तर 'भारत जोडो यात्रा' मध्येही सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र उद्या आदित्य ठाकरे शिवसेनेकडून 'भारत जोडो यात्रा' राहुल गांधी यांच्यासोबत चालणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
मातोश्री वर राऊत यांचं स्वागत होताच शंखनाद झाला, ढोलटाशे वाजवून शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.