Sanjay Raut Challenges PM Narendra Modi: भाजपच्या चेल्याचपाटांनी बोलू नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी; संजय राऊत यांचे आव्हान
Sanjay Raut, PM Narendra Modi | (Photo courtesy: archived, edited, symbolic)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (16 जानेवारी) मुंबई येथे महा पत्रकार परिषद (Maha Patrakar Parishad) पार पडते आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी गटाकडून ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेस बालीश पत्रकार परिषद म्हणून डिवचण्यात आले होते. त्यावाबत विचारण्यात आले असता आम्ही निर्भीड आहोत. म्हणून पत्रकार परिषद घेत आहोत. भाजपच्या चेल्याचपाट्यांनी यावर बोलू नये. आगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? याबाबत बोलावे. दहा वर्षे होत आली हे गृहस्थ देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत. एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी ती घेऊन दाखवावे, असे आव्हानच संजय राऊत यानी दिले आहे.

विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांनीही एखादी पत्रकार परिषद घ्यावी

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्षावर कसा दरोडा टाकला गेला हे तुम्हाला पाहायला मिळेल. नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील एखादी अशी पत्रकार परिषद घ्यावी. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आतापर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनीही जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी एकतरी पत्रकार परिषद घ्यावी आणि तीसुद्धा खुली पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान देत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Press Conference Today: उद्धव ठाकरे गौप्यस्फोट करणार? आजची महापत्रकार परिषद किती वाजता? कुठे पाहणार? घ्या जाणून)

कशी असेल आजची पत्रकार परिषद?

आजची पत्रकार परिषद सर्वांसाठी खुली असणार आहे. कोणीही प्रश्न विचारु शकतो. सर्वांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. त्यासाठी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील वकिलही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी ते विचारावेत, असे राऊत म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Approaches Supreme Court: उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान)

महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले

दरम्यान, जे या पत्रकार परिषदेवर टीका करतात त्यांनी सरकारी खर्चातून जी उधळण सुरु आहे त्याकडे पाहा. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. त्यावर कधीतरी बोलावे. आता मुख्यमंत्र्यांनी लवाजमा घेऊन दावोसला सहल काली आहे. अक्षरश: सरकारी पैशातून कोट्यवधी रुपयांची उधळण सुरु आहे. त्यामुळे जे आमच्यावर बालिशपणाचे आरोप करता त्यांनी स्वत:कडे पाहावे. त्यांनी लोकशाहीचा खून केला आहात, असेही संजय राऊत म्हणाले.