आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. शनिवारी जळगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, महाराष्ट्रात 2014-1019 दरम्यान भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार असताना भाजपने शिवसेनेला गुलामांप्रमाणे वागवले. तसेच त्यांनी सरकारमध्ये शिवसेनेला प्राधान्य न देता शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राऊत म्हणाले की, मागील सरकारमध्ये शिवसेनेला नेहमीच दुय्यम दर्जा मिळाला होता.
ते म्हणाले की, मागील सरकारमध्ये कधीच शिवसेनेकडे लक्ष दिले जात नव्हते आणि पक्षाला गुलामांसारखे वागवले जात होते. शिवसेनेला संपवण्यासाठीही प्रयत्न केले गेले. आमच्या समर्थनामुळे प्राप्त झालेली शक्ती आमचाच नाश करण्यासाठी वापरली गेली. जरी शिवसैनिकांना काहीही मिळाले नसले तरीही, आपण आता अभिमानाने म्हणू शकतो की राज्याचे नेतृत्व शिवसेनेच्या ताब्यात आहे.
Despite the fact that Shiv Sena was in power during the past 5 years, attempts were made to eradicate Shiv Sena's presence from every village. We were treated like slaves: Shiv Sena leader Sanjay Raut at a meeting of party office-bearers in Jalgaon, Maharashtra pic.twitter.com/8sO4zRPFMW
— ANI (@ANI) June 13, 2021
रविवारी नाशिकमध्ये राऊत म्हणाले की, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. राऊत यांचे वक्तव्य अशावेळी समोर आले आहे, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची खासगी भेट घेतली होती. याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मानस व्यक्त केला होता. यावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची इच्छा चुकीची नाही, परंतु शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहणार आहे. (हेही वाचा: उद्धव ठाकरे पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बदलाच्या केवळ अफवा; संजय राऊत यांची माहिती)
जळगावच्या राजकारणावर ते म्हणाले की, या जिल्ह्यात शिवसेना मजबूत आहे. येथे होणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसैनिक मानसिकदृष्ट्या सज्ज आहेत. येथे आम्ही नगरपालिका परिषद, जिल्हा परिषद, विधानपरिषद आणि लोकसभा स्वबळावर जिंकू. जळगाव येथील शिवसैनिक आमदार, महापौर झाले आहेत. आता खासदारही शिवसैनिकांचे असावेत अशी शिवसैनिकांना आशा आहे.
दरम्यान, 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप युती तुटली होती. शिवसेना हा भाजपच्या जुन्या मित्रपक्षांपैकी एक होता. नंतर त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबर अनपेक्षित युती करुन सरकार स्थापन केले.