Sanjay Raut On Maha Vikas Aghadi: उद्धव ठाकरे पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बदलाच्या केवळ अफवा; संजय राऊत यांची माहिती
Sanajay Raut | Photo Credits: Twitter/ANI

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मागील काही दिवसांत कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षांमध्ये अनपेक्षितरित्या काही मंडळींच्या गाठीभेटी होत आल्याने, काही भुवया उंचवणारी वक्तव्य समोर आल्याने महाविकास आघाडीत 'बिघाडी' होतय का? असा प्रश्न काहींच्या मनात डोकावत आहे. पण आज जनसामान्यांच्या मनातही हा प्रश्न दूर करण्यासाठी मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बदलाचे वृत्त केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी बोलू दाखवला आहे.

महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्त्वामध्ये आली तेव्हाच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर 5 वर्षांसाठी सार्‍यांचे एकमत झाले होते.  आता जर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होत असतील तर ते खोटे वृत्त आणि अफवा असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि आगामी निवडणूका यावर बोलताना त्यांनी तीन पक्ष किमान समान कार्यक्रम घेऊन एकत्र आले आहेत. सत्तेसाठी 3 पक्ष विलीन करण्यात आलेले नाहीत त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या क्षमतेनुसार, मिळणार्‍या संधी नुसार पक्ष वाढवण्याची, कक्षा विस्तारण्याची पूर्ण मुभा आहे. कोणी तसा प्रयत्न केल्यास राजकारणातते चूक नाही. शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेस प्रत्येक निवडणूक एकत्रच लढवेल असे नाही. तशी आमच्यात वचनबद्धता नाही.

स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करता आम्ही तो निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडला आहे. सध्या महाविकास आघाडी केवळ लोकसभा आणि राज्य स्तरावरील निवडणूकींच्या रणनीतींचा एकत्र विचार करू शकतो.