शिवसेना (UBT) खासादर संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. आमदार सुनिल राऊत यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती आहे. या प्रकारानांतर खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही जिवे मारण्याची धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) आली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन प्रमुख नेत्यांना आलेल्या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय राऊत हे शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख नेते आहेत. उद्धव ठाकरे गटाची राजकीय भूमिका ते जोरकस आणि आक्रमकपणे प्रसारमाध्यमांपुढे मांडतात. अनेकदा ते आपल्या आक्रमक भाषाशैली आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतात. त्यामुळे ते नेहमीच विरोधकांच्या रडारवर असतात. अशा वेळी उद्धव ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. दसऱ्या बाजूला संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा, Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार)
ट्विट
Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut and I have received death threat calls since yesterday, asking them not to talk to the media in the morning. Mumbai Police Commissioner and state Home Minister have been informed regarding the incident: Sunil Raut, Uddhav Thackeray faction… pic.twitter.com/9t7grcNFok
— ANI (@ANI) June 9, 2023
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही एका ट्विटर हँडलवरुन जीवे मारण्याची धमकी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली . तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीबद्दल माहिती दिली. शरद पवार यांना एका ट्विटर हँडलवरुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली. या धमकीमध्ये 'भा*खाऊ तुझा दाभोलकर केला जाईल' अशा स्वरुपाची धमकी दिल्याचे पुढे आले आहे.