Opposition Stages 'Lungi Protest' Condemning 'Chaddi Baniyan Gang'

शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी एमएलए वसाहतीतील कँटीन व्यवस्थापकावर केलेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत बुधवारी विरोधकांनी महाराष्ट्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. या वेळी आंदोलकांनी गायकवाड यांच्या व्हायरल व्हिडिओतील पोशाखाची नक्कल करत लाल लुंगी आणि बनियन घातले होते. या व्हिडिओमध्ये गायकवाड कँटीन व्यवस्थापकाला मारहाण करताना दिसतात. या निदर्शनाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. “चड्डी बनियन गँगचा निषेध असो” अशा घोषणा देत त्यांनी गायकवाड यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली.

हा वाद गायकवाड यांनी खराब आणि जुनाट अन्न दिल्याचा आरोप करत व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरु झाला. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असली तरी ना व्यवस्थापकाने ना कॅटरिंग ठेकेदाराने कोणतीही अधिकृत तक्रार दिली आहे. गायकवाड यांनी मात्र आपली कृती योग्य ठरवत, गेल्या अनेक वर्षांपासून कँटीनच्या अन्नाबाबत तक्रारी करत असल्याचा दावा केला. “मी 30 वर्षांपासून इथे जेवतोय, पण काहीच सुधारणा नाही. अशीच वेळ पुन्हा आली, तर पुन्हा असंच वागेन, असे त्यांनी म्हटले.

आमदाराचा तो व्हिडिओ

विरोधकांकडून आंदोलन

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर सर्वपक्षीय टीका झाली. विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी गायकवाड यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली. “हे फक्त अन्नाचे प्रकरण नाही, तर जनतेच्या विश्वासाचा प्रश्न आहे,” असे परब यांनी स्पष्ट केले.