Sand smugglers | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात वाळू तस्करांनी ( Sand Smugglers) जोरदार उच्छाद मांडला आहे. वाळू तस्करांची मजल चक्क तहसीलदार (Tehsildar) आणि शासकीय वाहनांवर हल्ले (Attack) करण्यापर्यंत गेली आहे. आटपाडी-मुढेवाडी रोडवर रात्रीच्या सुमारास अशी घटना घडल्याचे वृत्त आहे. आटपाडीच्या तहसीलदार बीएस माने यांच्या वाहनावर वाळूतस्करांनी (Sand Smugglers Attack Tehsildar at Atpadi) डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुढे आला आहे. तहसीलदारांच्या वाहनचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने तहसीलदार आणि वाहनातील कर्मचारी सुखरुप बचावले. या घटनेनंतर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

धक्कादायक म्हणजे डंपर चालकाने तहसीलदारांच्या वाहनावर डंपर घातल्यामुळे या वाहनाचे दरवाजे डंपरमध्येच अडकले. त्यामुळे तहसीलदार काही काळ डंपरमध्येच अडकून पडल्या. प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार बी एस माने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत आणि पथकासोबत वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी आबानगर चौकात गस्त सुरु असताना एक डंपर भरधाव वेगाने येतअसल्याचे समजले. पथकाने त्या डंपरचा पाठलाग केला. या वेळी डंपरने चकवा दिला. तहसीलदारांचे पथक डंपरचा पाठलाग करत होते. (हेही वाचा, Thane: वाळू माफियांनी खोदलेल्या विहिरीत शहापूरमधील 12 वर्षीय निष्पाप मुलाचा दुर्दैवी अंत, गावकऱ्यांनी केली चौकशीची मागणी)

दरम्यान, वाळू तस्करी करणारा डंपर मुडेवाडीकडून भरधाव वेगाने आला. हा डंपर थेट तहसीलदारांच्या वाहनावरच आला. या धक्कादायक प्रकारात तसहीलदारांच्या वाहनाचे दरवाजे डंपरमध्येच अडकले. त्यामुळे तहसीलदारांना काही काळ त्यांच्या वाहनातच अडकून राहावे लागले. या घटनेनंतर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.