Photo Credit- X

महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यात MBBS च्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर तिच्या दोन वर्गमित्रांनी आणि त्यांच्या एका मित्राने दारूमध्ये विष मिसळून बलात्कार केल्याचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी (23 मे) दिली आहे. पुणे, सोलापूर आणि सांगली येथील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 27 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

22 वर्षीय वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीवर 18 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास, जेव्हा ती आणि आरोपी एका थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची योजना आखत होते, तेव्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. त्याआधी, आरोपी तिला थोड्या वेळासाठी एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी तिला नशा असलेले पेय देऊ केले. ते प्यायल्यानंतर तिला चक्कर आल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

मूळ कर्नाटकातील बेळगाव येथील रहिवासी असलेल्या पीडितेने नंतर तिच्या पालकांना ही घटना सांगितली, त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात संपर्क साधला. नक्की वाचा: Varanasi Gangrape Case खोटी? लैंगिक अत्याचार प्रकरणातील तक्रारदार त्या दिवसांमध्ये सोशल मीडियावरील फोटोंमध्ये हसताना, फिरताना दिसली .

आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत सामूहिक बलात्कार आणि इतर आरोपांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तक्रारदाराच्या जबाबाचे विश्लेषण करत आहेत आणि पुढील चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

हुंडा आणि कौंटुबिक अत्याचारामध्ये खालील ठिकाणी तक्रार करू शकाल- 

राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन नंबर- 1800-180-5220

महाराष्ट्र राज्य महिला आयोग - (०२२) २६५९२७०७

महाराष्ट्र राज्य महिला आयोग हेल्पलाईन नंबर- १५५२०९

हिंंसाचार प्रकरणी तक्रार - 7827170170

Women Helpline Number - 112