Sagar Sadabhau Khot | (Photo Credits: Facebook)

रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा मुलगा सागर खोत (Sagar Khot) याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे Swabhimani Shetkari Saghtana) कार्यकर्ते रवीकिरण राजाराम माने (वय 35, रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कासेगाव पोलीस ठाण्यात (Kasegaon Police Station) गुन्हा नोंद झाला. प्राप्त तक्रारीनुसार, सागर खोत आणि इतर चौंघावर घरात घुसुन मारहाण करणे, शस्त्रांचा धाक दाखवत धमकावने असे आरोप आहे. वाळवा (Walwa) तालुक्यातील तांबवे (Tambave) येथे सोमवारी रात्री सागर खोत आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून रवीकिरण राजारामन माने यांना मारहाणीची घटना घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतो आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करत असल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली, असाही आरोप रवीकिरण माने यांनी केला आहे.

रवीकिरण माने यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सागर सदाभाऊ खोत, अभिजीत भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी (तिघेही रा. इस्लामपूर) आणि सत्यजीत कदम (रा. शिराळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. सागर खोत आणि त्याचे इतर तीन साथीरादर सोमवारी (6 सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास हातात तलवार, चाकू, गुप्ती अशी धारदार शस्त्रे घेऊन रवीकिरण माने यांच्या घरात घुसले. घरात आल्याबरोबत त्यांनी रवीकिरन माने यांना धमकवायला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतो आणि सदाभाऊंवर टीका करतोस? का तुला मस्ती आली आहे काय? थांब, तुला आता जीवंतच सोडत नाही, अशी धमकी देत त्यांनी मारहाण केली. (हेही वाचा, Maharashtra: दोन दिवसात Remdesivir इंजेक्शन लोकांना न मिळाल्यास कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर धडकणार असल्याचा सदाभाऊ खोत यांचा इशारा)

दरम्यान, रवीकिरण माने यांना मारहाण होताना सोडविण्यास गेलेल्या आई, वडील, भाऊ वृषसेन आणि पत्नी मनोरमा यांनाही सागर खोत आणि सहकाऱ्यांनी धक्काबुक्की केली. या वेळी झालेल्या झटापटीत परिसरातील लोक जमा झाले. लोक जमा झाल्याचे पाहताच सागर खोत आणि सहकाऱ्यांनी तेथून पोबारा केला. त्यानंतर रवीकिरण माने यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा तक्रार दिली.