
पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपल्याने 5 दिवसांनंतर आज (10 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांगलीमध्ये दाखल झाले आहेत. सांगलीच्या हिराबागेत परिसरात मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांनी स्थानिक जिल्हाधिकारी, लष्करी ऑफिसर यांच्याकडून सांगलीच्या पूराचा आढावा घेतला. एका नकाशाच्या माध्यामातून त्यांना कोणत्या भागात किती नुकसान झालं आहे याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी मंत्री, पोलिस ताफा होता. दरम्यान हिराबाग कॉर्नर भागामध्ये मुख्यमंत्री पोहचले असताना स्थानिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. मुख्यमंत्र्यांनी उशिर केल्याने रोष व्यक्त केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहेत. मात्र पोलिसांनी घोषणा देणार्यांना दूरच रोखून ठेवले.
मागील आठ दिवसांपासून कोसळत असणार्या पावसाने सध्या महाराष्ट्रातील सारेच पावसाचे विक्रम मोडीत काढले. त्यामुळे अचानक वाढत गेलेल्या पावसाच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले आहेत. त्यांच्या बचावासाठी सैन्याची पथकं, एनडीआरएफची टीम सज्ज आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. Flood In Maharashtra: पूरग्रस्तांना रोखीनं मदत देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा निर्णय
सांगलीमध्ये पूर ओसरतोय
#FloodSangli पाणी पातळी कमी होत आहे, घाबरून जावू नका , प्रशासन सज्ज आहे – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी@CMOMaharashtra @DeshmukSubhash @MahaDGIPR pic.twitter.com/xJV0URknC4
— District Information Office, Sangli (@Info_Sangli) August 9, 2019
सध्या राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना रोखीने मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या टीकेनंतर हा निर्णय पूरग्रस्तांसाठी दिलासादायक आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीतील पूराची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर येऊनही केवळ हवाई पहाणी करून माघारी गेले होते. मात्र आता पूराचं पाणी ओसरत असल्याने आणि पावसानेही उसंत घेतल्याने मदत कार्याचा वेग वाढला आहे. आज मुख्यमंत्री सांगलीतील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील घोषणा करण्याची शक्यता आहे.