Sangli Flood: सांगलीमध्ये पूर परिस्थितीचा फायदा घेऊन 2 कैदी पळाले; 390 जणांचे खास बोटीतून स्थलांतर
Sangli Flood (Photo Credits: Twitter)

सांगलीमध्ये पूर परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये पूरस्थिती कायम आहे. नदी, धरणांमध्येही पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने स्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. नागरिकांच्या बचावासाठी विविध यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. पुराचे पाणी कारागृह परिसरातही बसला आहे. कारागृहात पाणी शिरल्याने सुमारे 390 कैदी बाहेर काढण्यात आले आहेत मात्र त्यापैकी दोन जण पळून गेले आहेत. Sangli Flood: आलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेकचा विसर्ग करून सांगली मधील पाणी कमी करण्याचा प्रयत्न; घाबरून न जाण्याचं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

सांगलीमध्ये 50 हजाराहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. कैद्यांना बाहेर काढण्यासाठीदेखील जेलर नी अधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. सध्या पटवर्धन हायस्कूलमध्ये कैद्यांची रवानगी करण्याची तयारी सुरू आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा घेऊन दोघा कैद्यांनी पलायन केले आहे.

दरम्यान आज ब्रम्हनाळ गावामध्ये बचावकार्य करताना बोट उलटल्याने 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या बोटीच्या इंजिनमध्ये फांदी अडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.