Sangli Flood: आलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेकचा विसर्ग करून सांगली मधील पाणी कमी करण्याचा प्रयत्न; घाबरून न जाण्याचं देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Sangli Flood (Photo Credits: Twitter)

Sangli Rains And Flood Updates: अतिवृष्टीमुळे  सातारा, सांगली आणि कोल्हापूर शहराला मोठा फटका बसला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन या पूरस्थितीबद्दल माहिती दिली आहे. हवाई पाहणी करून त्यांनी कोल्हापूर, सातारा शहरातील  परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सांगलीला पूराचा वेढा असल्याचं तसेच या शहरातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बचावकार्य अधिक वेगवाग करण्यासाठी मदत वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सांगलीतील ब्रम्हनाळ गावात बोटीच्या इंजिनमध्ये फांदी अडकल्याने दुर्घटना घडल्याचं समजले आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन निर्णय न घेण्याचं आवाहन केलं आहे.  लोकं प्रशिक्षित नसल्याने एअरलिफ्टींग  टाळल्याचं म्हटलं जात आहे. Maharashtra Monsoon Update 2019: मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट

कर्‍हाडमध्ये पाणी ओसरत आहे

223 बाधित, 18 गावांना पूर्ण वेढा 8923 स्थलांतरित 97,000 स्वतःहून स्थलांतरित झाले आहेत. 60 बोटी काम करत आहे. कोस्ट गार्‍ड, स्थानिक आणि एनडीआरएफ काम करत आहे. कोल्हापूर, सांगली मध्ये प्राधान्याने मदत. 3813 घरं पडली आहेत. 89 घरं बाधित आहेत. पाणी ओसरल्यानंतर हा आकडा अधिक वाढू शकतो. (Sangli Flood: सांगली येथील ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर)

 

अन्न धान्य , औषधं यांची मदत केली जाणार आहे. इलेक्ट्रीसिटी बंद झालेल्या ठिकाणी पुन्हा सुरू केली जाणार आहे. शॉक सर्किट टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 67,000 जमीनीवरील शेती खराब झाली आहे. उसाची शेती खराब होण्याची शक्यता. औषधं देखील एअरलिफ्ट करून दिली जाईल

पेट्रोल, डिझेल टंचाई कमी केली जाईल. बचावकार्यासाठी प्राधान्य दिले जाईल. पाण्याची पातळी कमी करण्यासाठी मदत येदियुरप्पा यांनी मान्यता देऊन 5 लाख क्युसेसने विसर्ग होईल. पाणी निचरा होण्यास मदत होईल. डोनियरची व्यवस्था केली आहे. राज्यसरकार पूरस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली जाणार आहे. जनादेश यात्रा थांबवण्यात आली आहे.