सांगली: रहिवासी परिसरात शिरलेल्या 12 फुटी मगरीला स्थानिकांनी 'असे' केले रेस्क्यू (Watch Video)
Crocodile was rescued by locals (Photo Credits: ANI)

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती (Floods) निर्माण झाली आहे. पूर ओसरल्यानंतर आता अनेक ठिकाणी मगरी आढळून आल्याच्या घटनाही समोर येत आहेत. मगरी रहिवाशी परिसरात शिरल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या सर्व पूरपरिस्थितीला समोरे जाण्यासाठी जिल्हांमध्ये मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात रहिवासी परिसरात मगर शिरली असून स्थानिक तिला रेस्क्सू करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. (Viral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित)

सांगली जिल्ह्यातील (Sangali District) सांगलवाडी (Sangalwadi) रहिवासी परिसरात 12 फूट लांब मगर शिरली होती. स्थानकिांनी रेक्स्यू करत तिला वनविभागाकडे सुपूर्त केले, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. (Maharashtra: सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रस्त्यांवर दिसली मगर, Watch Video)

ANI Tweet:

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की, रहिवासी परिसरातून बाहेर काढण्यासाठी लोक जाड दोरीच्या मदतीने मगरीला खेचत आहेत. जेव्हा लोक मगरीला खेचत आहेत केव्हाच मगर जबडा उघडून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर मगरीला वाचवण्यात लोकांना यश येते. त्यानंतर मगरीला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.