मनसेच्या 'शॅडो कॅबिनेट' या कल्पनेची आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर अनेक मनसे नेते आता शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. दरम्यान 105 आमदारांसह विधिमंडळात विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या भाजपाऐवजी अवघ्या 1 आमदार असलेल्या मनसेच 'शॅडो कॅबिनेट' हा विनोद आहे. असं आजच्या सामन्याच्या अग्रलेखात म्हटलं आहे. दरम्यान यासोबतच ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं. असं म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. आता यावर प्रत्युत्तर देताना, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री पद अजित दादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात.एकही महत्वाच खात नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या श्याडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे श्याडो मुख्यमंत्रीपद देऊन वेळ चा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा असं ट्वीट केलं आहे. तर आज सकाळी अमेय खोपकर यांनी देखील खास ट्वीट करत शिवसेनेला प्रत्युत्त्तर दिले आहे. 'शॅडो कॅबिनेटचा प्रयोग हा खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग ठरू नये'; शिवसेना कडून मनसेच्या Shadow Cabinet वर टीका.
संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री पद अजित दादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात.एकही महत्वाच खात नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या श्याडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे श्याडो मुख्यमंत्रीपद देऊन वेळ चा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 11, 2020
अमेय खोपकर यांची प्रतिक्रिया
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 11, 2020
दरम्यान मनसेच्या 14व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी मनसे नेत्यांवर महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर वचक ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट बनवलं आहे. दरम्यान राज्यशास्त्रात याकडे पर्यायी सरकार म्हणून पाहिलं जातं. परंतू मनसेकडे विधानसभेत तितकी राजकीय शक्ती नसल्याने मनसेचं शॅडो कॅबिनेट प्रभावी ठरणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.