'समता एकता परिषद' ची घोषणा;  माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते 11 एप्रिलला होणार उद्धाटन
Eknath Khasde | Twitter

देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक चळवळीमध्ये एक नवीन सामाजिक संघटना स्थापना करण्यात येत आहे. "समता एकता परिषद" या नावाने ही संघटना असणार आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीवर काम करण्यासाठी देशभरात एक क्रांतीची मशाल घेऊन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक मोठे संघटन उभे करण्याचा मानस आहे.  अनिलभाऊ महाजन, मुंबई हे "समता एकता परिषद" चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी नव तरुणांसाठी एक आक्रमक संघटन एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये कुठल्याही एका जातीचे संघटन नव्हे तर सर्वसमावेशक संघटन सर्व जातीसमूहातील लोकांना यात स्थान मिळणार आहे. दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे संघटना "समता एकता परिषद" या नावाची घोषणा करण्यात येत आहे. याचे उद्घाटन माजी मंत्री, विद्यमान आमदार बहुजनांचे नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

"समता एकता परिषद" या संघटनेची भूमिका ध्येय उद्दिष्ट संघटनेचे काम करण्याची पद्धत कशा पद्धतीने संघटना चालवली जाणार आहे. या बाबत राष्ट्रीय अध्यक्ष "समता एकता परिषद" चे अनिल महाजन हे ११ एप्रिल २०२३ रोजी आपली सर्व भूमिका जाहीर करणार आहेत. संघटनेचे कामाचे स्वरूप काय असेल संघटनेचे बांधणी सभासद नोंदणी, कार्यकारिणी कशा स्वरूपात असेल याची संपूर्ण माहिती उद्घाटन प्रसंगी देण्यात येणार आहे. चालू घडामोडींवर काम करणारी एक ज्वलंत आक्रमक संघटना समता एकता परिषदे असणार आहे. देशात आणि राज्यात अनेक संघटना आहेत पण समता एकता परिषद चे नव्याने कार्य उभे राहणार आहे. समता एकता परीषद ची घटना, ध्वज, घोषवाक्य काय असणार याची सविस्तर माहिती मीडिया द्वारे प्रसिद्धी देण्यात येईल संघटनेची केंद्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येईल.

गेल्या पाच वर्षपासून एका जातीचे म्हणजे माळी समाजाचे संघटन अनिल महाजन हे चालवत होते. अनेकांच्या मनात प्रश्न असेल अनिल महाजन ही व्यक्ती किती संघटना सुरू करत आहे. पण सर्वाना सांगायचे आहे की सर्व समावेशक सर्वाना स्थान असणारी कुठला ही जाती भेद न करता सर्वाना सोबत घेऊन काम करण्यासाठी आम्ही ही पहिलीच आणि एकमेव संघटना म्हणजे "समता एकता परिषद" ची घोषणा करत आहोत. या परिषद मध्ये सर्व जाती धर्मातील युवकांना स्थान असेल. सर्व जाती-समूहातील अनेक विचारवंत आणि अभ्यासू व्यक्तींचे सल्लागार मंडळ या परिषद मध्ये समाविष्ट आहे. सर्वांना सोबत घेऊन देशभरात एक मोठे संघटन उभारण्याचा संकल्प अनिल महाजन यांनी केला आहे. चालू घडामोडीवर काम करणारे खुले व्यासपीठ असणार आहे.