Sammruddhi Mahamarg Accident

समृद्धी मार्गावरील अपघाताचं सत्र काही केल्या कमी होत नाही.समृद्धी महामार्गावर सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे, त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला  धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे .समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणाऱ्या या प्राण्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  जंगली प्राणी गाडीला आडवा आल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 196 जवळ हा अपघात झाला.  (हेही वाचा - Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video)

दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला  या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे  हा अपघात झाला. जंगली प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात कारणे तीन पलट्या मारल्या. या घटनेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. सुनंदा अनुज दुरतकर असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनुज दुरतकर (वय 65), पंकज अनुज दुरतकर (वय 35) भावना पंकज दुरतकर (वय 30) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.