Drugs Case: मुंबईतील 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना चौकशीसाठी बोलावले आहे. समीर खानचे लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफरशी झालं आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. यासंदर्भात आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे.
गूगल पे च्या माध्यमातून करण सजनानी आणि समीर खान यांच्यात 20,000 रुपयांचा व्यवहार झाल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. एजन्सीने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, हा व्यवहार ड्रग्ससंदर्भात झाला असावा. या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी एनसीबीने समीर खानला आज चौकशीसाठी बोलवलं आहे. (वाचा - Sandalwood Drug Case: अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा Aditya Alva ला सँडलवुड ड्रग्ज प्रकरणात अटक; 5 महिने फरार होता )
दरम्यान, आतापर्यंत एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावलं आहे. मंगळवारी एनसीबीने मुंबईचे मुच्छड पानवाला रामकुमार तिवारी ला अटक केली होती. एनसीबीने सोमवारी मुच्छड पानवाला चे मालक जयशंकर तिवारी आणि रामकुमार तिवारी यांची कित्येक तास चौकशी केली. रामकुमार तिवारी हा जयशंकर तिवारीचा धाकटा भाऊ आहे.
रामकुमार तिवारी आणि जयशंकर तिवारी दक्षिण मुंबईतील पॉश एरिया कॅम्प कॉर्नरमध्ये पान दुकान चालवतात. या पान दुकानात बॉलिवूड आणि इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटी पान खायला येतात. मलबार हिल परिसरात 'मुच्छड पानवाला' हे प्रसिद्ध दुकान आहे.