Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी एमपीएससीची परीक्षा (MPSC 2020) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. या संदर्भात संदर्भात नुकतीच राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत एमपीएससीची परिक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससी परिक्षेबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे संभाजीराजे (Sambhaji Raje), राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar), जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारचे आभारदेखील मानले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. राज्यात हळूहळू बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्याने सुरु होत आहेत. मात्र, अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करता येत्या 11 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मराठा समजातील अनेक संघटनांनी कौतूक केले आहे. हे देखील वाचा- MPSC Exam 2020 Postponed: एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

संभाजीराजे यांचे ट्विट-

राजेश क्षीरसागर यांचे ट्विट-

जयंत पाटील यांचे ट्विट-

एमपीएससीकडून आता परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल. यावेळी जी तारीख जाहीर करण्यात येईल त्या तारखेला ही परीक्षा निश्चित होईल. या परीक्षेला बसण्यास जे विद्यार्थी पात्र आहेत ते या परीक्षेला बसण्यास पात्र असतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.