Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा 2020 (MPSC Exam 2020) संदर्भात नुकतीच राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीची परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परीक्षा कधी होणार? याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. महाराष्ट्रात एमपीएससी परिक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी पार पडणार होती. तसेच या परिक्षेला 2 लाख 60 हजार विद्यार्थी बसणार होते.

मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचे तापले होते. एमपीएससीच्या परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रात 200 पेक्षा अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शाळा महाविद्यालय, अभ्यासिका बंद आहेत. एमपीएससीच्या परिक्षेला बसलेले काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत. तसेच परिक्षेला बसलेला विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रच राहणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Maratha Reservation: मराठा संघटनांचा 10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद तूर्तास मागे

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मराठा समजातील अनेक संघटनांनी कौतूक केले आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती.