Salman Khan Residence Firing Case: गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबारासाठी शस्त्र पुरवण्याचा आरोप असलेल्या Anuj Thapan चा आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये मृत्यू
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

सलमान खान च्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेला Anuj Thapan याचा आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी नुकतीच त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अनुजला गोळीबार प्रकरणात शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याने आज कमिशनर ऑफिसच्या क्राईम ब्रांचच्या लॉक अप मध्ये चादरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. 14 एप्रिलला सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातील शस्त्र अनुजने पुरवली होती. दरम्यान अनुजच्या आत्महत्येनंतर उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पंजाब च्या अबोहार गावामधून 5 दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी दोन जणांना पकडले होते. त्यामध्ये सोनू कुमार बिष्णाई आणि अनुज थापन याचा समावेश होता. अनुजने गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सागर पाल (21) आणि विकी गुप्ता (24) याला पनवेल मध्ये 15 मार्चला शस्त्र दिल्याचा आरोप आहे. दरम्यान त्यांच्या वकिलांनी हा दावा फेटाळला आहे. बिष्णोई आणि थापन यांचा आरोपी पाल आणि गुप्ता सोबत कोणताच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान थापन याच्या विरूद्ध यापूर्वी 3 गुन्हे आहेत. त्यामध्ये खून आणि खंडणीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. नक्की वाचा: Salman Khan च्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये वापरण्यात आलेली बंदूक, 3 मॅगझीन तापी नदीमधून जप्त - Mumbai Crime Branch ची माहिती .

Anuj Thapan याचा आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये मृत्यू

विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर त्यांना गुजरातच्या भूज भागातून अटक करण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, त्यांना 10 राऊंड्स फायर करण्याचे आदेश होते. 14 एप्रिलच्या रात्री बाईक वरून येऊन त्यांनी 4 गनशॉर्ट्स गोळीबार केला आणि पळ काढला.