Salary Agreement: बेस्ट कर्मचाऱ्यांना 8 ते 12 हजारांची पगारवाढ; तुटपुंज्या मदतीमुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
BEST Bus (Photo Credits: PTI)

गेले अनेक महिने मुंबईचे बेस्टचे कमर्चारी  (BEST Employees) आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. अनेकवेळा त्यांनी ‘बंद’ही पुकारला आहे. अखेर गणेशोत्सवात गणपतीची कृपा त्यांच्यावर झाली असल्याचे दिसत आहे. बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासन (Best Kamgar Sena and Best Management) यांच्यामध्ये आज एक महत्वाचा करार झाला (Salary Agreement). या कराराद्वारे कर्मचाऱ्यांचा पगार 5-12 हज्रांनी वादाहाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच यामधील तरतुदी या सातवा वेतन आयोगानुसार आहेत. हा करार 2016 ते 2021 या कालावधीसाठी केला गेला आहे.

बेस्ट कामगारांचे वेतनवाढ, सातवा वेतन आयोग लागू करावा अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरु होते. मात्र गणेशोत्सवामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या दरम्यान आज हा महत्वाचा करार पार पडला. मात्र त्यावर बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी करारानुसार कर्मचाऱ्यांना तुटपूंजी पगारवाढ मिळणार असल्याचे सांगून, गणेशोत्सवामुळे पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांमध्ये या निर्णयासंदर्भात एक बैठक पार पडली होती. (हेही वाचा: नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर 'बेस्ट कामगारां'च्या बेमुदत उपोषणाला स्थगिती; गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलन सुरु)

सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी 2750 कोटी इतकी अतिरिक्त निधीची गरज होती. बेस्टच्या मुख्य व्यवस्थापकाशी बातचीत केल्यानंतर, महापालिका जास्तीत जास्त 789 कोटी इतकाच निधी देऊ शकते अशी माहिती मिळाली होती. इतक्या कमी निधीमुळे फक्त 8 ते 10 टक्के पगाराच वाढू शकतो. त्यामुळे गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.