Suicide | (Photo Credits: unsplash.com)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. शीलवंत नांदेडकर (Shilwant Nandedkar) यांच्या 17 वर्षाचा मुलगा साहिल (Sahil Shilwant Nandedkar) याने आत्महत्या केली आहे. घरातच गळफास घेत त्याने आयुष्य संपवल्यल्याची बाब समोर आली आहे. 'मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, Love You Both' असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत त्याने गळफास घेतला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहिल नांदेडकर हा 12वीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. 12 ऑक्टोबरला त्याने आनंदात कुटुंबियांसमवेत दसरा साजरा केला. रात्री उशिरापर्यंत तो आई वडिलांसोबत गप्पा देखील मारत होता. नंतर ते आपापल्या खोलीत झोपायला गेले. सकाळी नांदेडकर 6 च्या सुमारास नियमित मॉनिंग वॉकसाठी उठले तेव्हा मुलगा उठला नसल्याचं लक्षात आले म्हणून त्याच्या रूमचे दार ठोठावले. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 4-5 वेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. त्यांनी तातडीने घरात इतरांना त्याची कल्पना दिली. नक्की वाचा: World Suicide Prevention Day: भारतामध्ये तरुण लोक करतात सर्वाधिक आत्महत्या; मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे- Expert .

दरम्यान साहिलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण साहिलच्या अकाली निधनाने सार्‍यांनाच धक्क बसला आहे.